सासूच्या डोक्यात लाकूड मारून जावायाने केला खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

फारकतीला सासूचा विरोध होता. त्यातूनच शुक्रवारी (ता.19) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गणेश काकडे हा सिंगणापूर येथे गेला. त्यावेळी सीताबाई उमाजी खिल्लारे या अंगणात झोपल्या होत्या. गणेशने लाकडाने त्यांच्या डोक्यात मारले. यात सिताबाई जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

परभणी : घरगुती कारणावरून एका जावयाने त्याच्या सासूच्या डोक्यात लाकूड मारून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.19) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिंगणापूर (ता. परभणी) येथे घडली.

सिंगणापूर (ता. परभणी) येथील सीताबाई उमाजी खिल्लारे (वय 68) यांच्या मुलीचा विवाह परभणी येथील गणेश वसंतराव काकडे यांच्यासोबत झाला होता. परंतु, गणेश आणि त्यांच्या पत्नीचे नेहमी वाद होत. त्यामुळे पत्नीपासून फारकत देण्याची मागणी गणेश हे त्यांच्या सासूकडे करीत होते. परंतू फारकतीला सासूचा विरोध होता. त्यातूनच शुक्रवारी (ता.19) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गणेश काकडे हा सिंगणापूर येथे गेला. त्यावेळी सीताबाई उमाजी खिल्लारे या अंगणात झोपल्या होत्या. गणेशने लाकडाने त्यांच्या डोक्यात मारले. यात सिताबाई जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी उत्तम उमाजी खिल्लारे यांनी दैठणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दैठणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार हे अधिक तपास करित आहेत.

Web Title: man kills mother in law for divorce