पिस्तुलधारी युवकाला अटक, दोन जीवंत काडतूस जप्त

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 22 जून 2018

नांदेड : आज (ता. 22) पहाटे दोन वाजता गस्त घालत असताना इतवारा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोळंके यांनी एमजी रोडवरून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जीवंत काडतूस जप्त केली.

नांदेड : आज (ता. 22) पहाटे दोन वाजता गस्त घालत असताना इतवारा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोळंके यांनी एमजी रोडवरून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जीवंत काडतूस जप्त केली.

सराईत गुन्हेगार असलेला सोहन रौत्रे (वय 28, रा. जुना मोंढा, नांदेड) हा रात्री नशेत हातात पिस्तुल धरुन येणाऱ्या जाणाऱ्याना फायर करण्याची धमकी देत होता. यावेळी फौजदार सोळंके यांनी त्याला शिताफीने पकडले. त्याच्या विरूध्द इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या गस्तीत गर्जे, स्वामी, जाधव आणि खाजा या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पोलिस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी डीबी पथकाचे कौतूक केले.

Web Title: a man with pistol arrested in nanded