आईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने घेतले जाळून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात घडली आहे. स्कार्पिओ गाडीवर डिझेल टाकून गजानन कोडलवाडे या इसमाने स्वताला गाडीसह जाळून घेतले.

लातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात घडली आहे. स्कार्पिओ गाडीवर डिझेल टाकून गजानन कोडलवाडे या इसमाने स्वताला गाडीसह जाळून घेतले.

काल रात्री गजानन कोडलवाडे या इसमाने त्याच्या आईच्या चितेजवळच स्कार्पिओ गाडीवर डिझेल टाकले आणि स्वताला आतामध्ये लॉक करून जाळून घेतले होते. या घटनेत गजाननचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे तीन दिवसांपूर्वी गजाननाच्या आईचा मृत्यू झाला होता त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आली होते.

व्यवसायाने खासगी वाहन चालक असलेल्या गजाननचे दोन लग्न झालेली आहेत. यामुळे कौटूंबिक कलह वाढला होता. त्यातच त्याच्या आईचा मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. गजाननने आत्महत्या का केली असावी याची माहिती सध्या पोलिस घेत आहेत.

Web Title: Man set himself on fire during his mothers funeral