आठ लाखांचे वीजबिल बघून भाजीविक्रेत्याची आत्महत्या 

अनिलकुमार जमधड़े
गुरुवार, 10 मे 2018

औरंगाबाद : शहरातील भारत नगर भागातील एक भाजीविक्रेत्याला महावितरणाने तब्बल आठ लाख रुपयांचे बिल दिले. दररोज भाजी विक्रीतुन तिनशे चारशे रुपये मिळतात, मग आठ लाख रुपये कसे भरणार असा प्रश्न पडला, महावितरण कार्यालयात तक्रार केली पण सहानुभूती देऊन समाधानकारक उत्तर देत नव्हते. त्याच्यामुळे जबरदस्त शॉक बसलेल्या भागिनाथ नेहजी शेळके यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

भारत नगर येथे पत्र्याच्या पार्टिशन केलेल्या घरात हे कुटुंब रहाते. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात बिल कमी करावं म्हणून तक्रार केली होती. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यंचा पुतण्या कॄष्णा शेळके यांनी सकाळ शी बोलताना सांगितले. त्यांची पत्नी समारंभानिमित्त अंबड तालुक्यात गेलेली होती. तर मुलगा गरमीमुळे घराच्या बाहेर झोपलेला होता. घरात एकटे असलेल्या जगन्नाथ यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

बारा वाजेपर्यंत महावितरण कार्यालयाला याबद्दल काहीही ही माहिती नव्हती. सुरवातीला असा काही प्रकार झालाच नाही. असे अधिकारी सांगत होते. अखेर त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट व्हायरल झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचा पवित्रा घेतला. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जगन्नाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेला असून न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे कृष्ण शेळके यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Web Title: a man suicide due to 8 lacks rupees light bill