नैराश्यातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 जानेवारी 2019

लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली.
 

कायगाव : लखमापूर (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद)येथील सोपान कचरू गाढे (वय- 50) यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) घडली.

शुक्रवारी (ता. 18) नैराश्य, ताणतणावामुळे रागाच्या भरात ते घरून निघून गेले होते.
त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतले असतांना शिवारातील बागळ यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ग्रामस्थांनी या घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना दिली. पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश काथार, ज्ञानेशवर पाडाळे, कायगावचे पोलीस पाटील संदीप चित्ते हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पंचनामा करून सोपान यांचा मृतदेह गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पूढील तपास पोलीस हेडकान्स्टेबल गणेश काथार करित आहेत.

Web Title: man Suicide due to depression