जावयाची आत्महत्या, सासरवाडीच्या लोकांचा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

मयताचे नाव राजेश मारोतराव कामजळगे (वय ४०) यांचा व त्यांच्या पत्नीचा मागील काही दिवसांपासून वाद होता. त्यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हाही दाखल झाला होता. पत्नी आपल्या धर्माबाद येथे माहेरी राहत होती. राजेश कामजळगे हा आपल्या दोन मुलांना घेऊन बहिणीकडे राहत होता.

नांदेड : शहराच्या विष्णुनगर भागात बहिणीकडे राहणाऱ्या एका व्यक्तिने शनिवारी (ता. ७) गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयताचे नाव राजेश मारोतराव कामजळगे (वय ४०) यांचा व त्यांच्या पत्नीचा मागील काही दिवसांपासून वाद होता. त्यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हाही दाखल झाला होता. पत्नी आपल्या धर्माबाद येथे माहेरी राहत होती. राजेश कामजळगे हा आपल्या दोन मुलांना घेऊन बहिणीकडे राहत होता. रागाच्या भरात त्याने गळफास घेतला.

मृतदेह शासकिय रुग्णालयात दाखल केला. यावेळी त्याची पत्नी व सासरवाडीची मंडळी रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाली. आत्महत्या नसून हत्या असल्याचा वाद घालत गोंधळ घातला. यावेळी दोन्ही बाजूच्या महिलांनी चांगलाच वाद घालत मारहाण केली. शिवाजीनगर ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे....

Web Title: man suicide in Nanded