एव्हरेस्ट सर करण्याची 'मनिषा' पूर्ण

Manisha Waghmare
Manisha Waghmare

औरंगाबाद : गतवर्षीची हुलकावणी.. माघारी फिरून नव्याने केलेली सगळीच तयारी.. पुनश्च हरिओम करत पुन्हा आखलेली माउंट एव्हरेट सर करण्याची मोहीम औरंगाबादकर प्राध्यापक मनीषा वाघमरेने सोमवारी (ता. २१) सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी फत्ते केली. 

प्रकृती ठणठणीत तयारी जबरदस्त असताना २०१७ साली आखलेली माउंट एव्हरेस्टची मोहीम निसर्गाच्या अवकृपेने अर्धवट सोडून प्रा. मनीषा वाघमारे माघारी फिरली होती. शिखरमाथा अवघा १७० मीटर राहिला असताना माघारी फिरावे लागल्याची सल मनात कायम ठेवून मोहीम गुंडाळली गेल्यामुळे किंचित खचलेल्या मनीषा वाघमरेने ही मोहीम नव्याने आखली. प्रकृती ठणठणीत होताच तिने नव्याने डाव आखत जुळवाजुळव सुरू केली आणि एप्रिल २०१८ मध्ये पुन्हा एव्हरेस्टच्या दिशेने वाटचाल सुरू केली. इंडियन कॅडेट फोर्सची स्वयंसेवक आणि महिला महाविद्यालयाची शारीरिक शिक्षण विभाग संचालक असलेल्या मनीषाने एव्हरेस्ट परिसरातील शिखरांवर आपला सराव सुरू ठेवला होता. गुरुवारी (ता. १७) ती एव्हरेस्ट बेस कॅम्प सोडून कॅम्प १ कडे सरकली. त्यानंतर कॅम्प १, कॅम्प २, कॅम्प ३, ४ साऊथकोल मार्गे ती माउंट एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर (८८४८ मीटर) पोचली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तिने समिट केल्याची माहिती आयसीएफचे जगदीश खैरनार यांनी दिली. त्यानंतर ती माघारी फिरली असून तिचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. साधारण २ ते ३ दिवसात ती बेस कॅम्पला परत पोचणार आहे. 

प्रकृती ठणठणीत, हवामानाची साथ
प्रा. मनीषा वाघमरेला यंदा निसर्गाने पण साथ दिल्याने ही मोहीम फत्ते झाली. मानिषा सोबत तिच्या टीम मधील अन्य गिर्यारोहकांचेही समिट झाले असून सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती जगदीश खैरनार यांनी दिली. गतवर्षी या मोहिमेत मानिषाच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याने तीला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com