मनीषा वाघमारे करतेय एव्हरेस्टचा चढाईपूर्व सराव   

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

औरंगाबाद - माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी रवाना झालेल्या औरंगाबादकर प्रा. मनीषा वाघमारेचे एव्हरेस्ट चढाईपूर्व प्रशिक्षण आणि सराव सुरू झाला आहे. आईस ट्रेनिंगचे सत्र पूर्ण करणारी मनीषा एव्हरेस्ट आणि परिसरातील शिखरे चढणार आहे. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माउंट एव्हरेस्ट सर करण्यास रवाना झालेल्या मनीषाने काठमांडू येथे पोचून पुढील प्रवास पूर्ण करीत एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला आहे. येथे चढाईची तयारी तिने सुरू केली आहे. मुख्य एव्हरेस्ट पर्वत चढण्यापूर्वी आवश्‍यक असलेल्या सराव सत्रांना तिने सुरवात केली आहे. 

एव्हरेस्ट बेस कॅम्पलगत असलेल्या ग्लेशियरवर तिने आईस ट्रेनिंग सध्या सुरू ठेवले आहे. यात ग्लेशियरवर चढणे, दोन ग्लेशियरमध्ये असलेले अंतर शिडीच्या साहाय्याने कापण्याचा सराव तिने केला. याशिवाय हवामानाशी जुळवून घेणे आणि कठीण वातावरणाशी दोन हात करण्यासाठीचा सरावही तिने सध्या चालविला आहे. एका हातात एक्‍स; तर बुटाला लावण्यात आलेल्या क्रॅम्पॉन्सच्या साहाय्याने ही चढाई ती करीत आहे.

Web Title: Manisha Waghmare pre-climbing the Everest

टॅग्स