मनिषा वाघमारेंचे 'मिशन एव्हरेस्ट' १५ मेपासून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सामान्य वातावरणात २ ते २.५ हजार कॅलरी शरीर बरे करते. पण या थंड आणि उणे तापमान असलेल्या भागात चढाई करताना मनिषा दिवसाला १० हजार कॅलरी बर्न करणार आहे.

औरंगाबाद : येथील महिला गिर्यारोहक प्रा. मनिषा वाघमारेंची ध्येयाकडे चढाई १५ मेदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. एव्हरेस्ट चढाईपूर्वी करावे लागणारे सर्व सोपस्कार, चढाई मोहिमा तिने पूर्ण केल्या आहेत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर अनेक आठवडे मुक्कामी राहिलेल्या मनिषाने परिसरातील सर्व शिखरे आणि एव्हरेटच्या दिशेला असलेल्या कॅम्प १, २ आणि ३ पर्यंत मजल मारत आपली शारीरिक क्षमता सिद्ध केली आहे. 

तिची ही मोहीम अंतिम टप्प्यात अाली असून, आता १५ मेदरम्यान ती एव्हरेस्ट चढाईला सुरवात करणार आहे. एव्हरेस्टवर वाऱ्याचा वेग प्रचंड असून, १३ मेदरम्यान वातावरण गिर्यारोहणाचा पोषक होण्याची चिन्हे आहेत. सध्या कॅम्प २ आणि ३ पर्यंत रोप फिक्सिंग करण्यात आली असून, अजून वरपर्यंतचे काम हाती घेण्यात येणार आहे. शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी मनिषा बुधवार (ता. ९) पासून तीन दिवस नामचे बाजार या गावात कमी उंचीवर राहणार आहे. 

दिवसाकाठी १० हजार कॅलरी

सामान्य वातावरणात २ ते २.५ हजार कॅलरी शरीर बरे करते. पण या थंड आणि उणे तापमान असलेल्या भागात चढाई करताना मनिषा दिवसाला १० हजार कॅलरी बर्न करणार आहे.

Web Title: Manisha Waghmares Mission Everest from May 15