मांजरा कारखाना देणार उसाला शंभर रुपये जादा भाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

अपुरा पाऊस आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून उसाला प्रतिटन शंभर रुपये जादा भाव देण्यात येणार आहे. सरलेल्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला आतापर्यंत दोन हजार 350 रुपये मेट्रिक टन भाव देण्यात आला असून आणखी शंभर रुपये जादा भाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी केली. 

लातूर- अपुरा पाऊस आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून उसाला प्रतिटन शंभर रुपये जादा भाव देण्यात येणार आहे. सरलेल्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला आतापर्यंत दोन हजार 350 रुपये मेट्रिक टन भाव देण्यात आला असून आणखी शंभर रुपये जादा भाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी केली. 

कारखान्याच्या शनिवारी (ता.17) आयोजित 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आमदार ऍड. त्र्यंबक भिसे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ऍड. श्रीपतराव काकडे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, संत शिरोमणी मारोती महाराज कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, पृथ्वीराज सिरसाट, गोंविद बोराडे, धनंजय देशमुख, यशवंतराव पाटील, मोईज शेख, जगदीश बावणे, बी. व्ही. मोरे, एस. व्ही. बारबोले, एस. डी. देशमुख, लेखापरीक्षक बी. एस. फासे, लालासाहेब चव्हाण, संभाजी रेड्‌डी, संभाजी सूळ, मनोज पाटील, रमेश सूर्यवंशी व भगवान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. देशमुख म्हणाले, ""लोकनेते विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात केलेल्या वाटचालीत मांजरा परिवाराने सहकार क्षेत्रात गौरवास्पद काम केले असून, याचे श्रेय शेतकरी सभासदांना जाते. प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून पिकवलेल्या उसाला योग्य भाव देऊन बांधिलकी जोपासण्याचे काम कारखान्याने वर्षानुवर्ष केले आहे. कारखान्याचे संचालक काटकसरीने व नियोजनपूर्वक कारखाना चालवून उसाला जादा भाव देण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी अडचणीत असताना त्याचा पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम कारखान्याने केले आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी निराश न होता निसर्गाने निर्माण केलेल्या संकटावर मात करावी.""कारखान्याकडून सर्व सभासदांना गुडीपाडवा, गौरी गणपती व दीपावली सणासाठी प्रती सभासद पन्नास किलो साखर सवलतीच्या दरात देण्यात येत आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनाही आता सवलतीच्या दरात साखर देण्यात येणार आहे. ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांचे उर्वरित कमिशन व डिपॉझिट तत्काळ देण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांच्या पंधरा टक्‍क्‍यांपोटी शिल्लक पन्नास टक्के रक्कमही तत्काळ दिली जाणार असल्याचे श्री. देशमुख यांनी जाहीर केले. 

कुशल नियोजनामुळे हंगाम यशस्वी 

कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे म्हणाले, ""प्रतिकूल परिस्थितीत माजी मंत्री देशमुख यांच्या कुशल नियोजनातून 149 दिवसांत सात लाख तीन हजार 541 टन एवढे विक्रमी गाळप करण्यात यश आले. जास्तीच्या क्षमतेने उसाचे गाळप करून सहकारी साखर उद्योगात कारखान्याने नवीन विक्रम प्रस्थापित केला."" यावेळी आमदार भिसे व यशवंतराव पाटील यांची भाषणे झाली. कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी विषयाचे वाचन केले. यावेळी संचालक धनंजय देशमुख, जगदीश बावणे, प्रताप पडिले, अशोक काळे, व्यंकट कराड, रावसाहेब मुळे, पांडुरंग सूर्यवंशी, तात्यासाहेब देशमुख, बंकट कदम, अतुल पाटील, वसंत उफाडे, अरुण कापरे, चॉंदपाशा अन्सारी, सदाशिव कदम, अनिल दरकसे, श्रीहरी चामले, उज्ज्वला कदम, मंगला पाटील, शाहुराज पवार, डॉ. सतीश कानडे व मुरलीधर निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manjara sugar factory will give 100 rs more for sugacane