बीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती

बीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती

बीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री बँक व आदित्य शिक्षण संस्थेची झाडाझडती घेतली.

नाशिक, औरंगाबाद व जालना येथील अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश होता. आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास आयकर विभागाचे पथक स्थाानिक 12 पोलिसांच्या मदतीने एकाचवेळी मंत्री बँकेच्या मुख्य शाखेसह हिरालाल चौकातील शाखा व आदित्य अभियांत्रिकी महाविद्यायात दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांसह संगणकीय नोंदणींची पाहणी सुरु होती.

नोटाबंदीनंतर काही संस्थांनी केलेल्या व्यवहारांची विविध ठिकाणी तपासणी सुरु असून अशीच पाहणी येथील आदित्य शिक्षण संस्थेने मंत्री बॅंकेत केलेल्या व्यवहाराचीही तपासणी केल्याची माहिती आहे. तपासणीच्या वेळेत बॅंकेचे इतर व्यवहार आणि संपर्क बंद होता. गेटही बंद करण्यातअाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ही तपासणी सुरु होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com