दुभंगलेल्या मनाची पुन्हा वेल गुंफली

दुभंगलेल्या मनाची पुन्हा वेल गुंफली

नांदेड : किरकोळ वादातून सुखी संसारात वाद उफाळून येऊन दुभंगलेल्या मनामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळण्यापूर्वी त्या वेली पुन्हा नव्या जोमाने फुलविण्याचे काम करण्यात आले. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ७८५ प्रकरणे दाखल झाली. यात दोन्ही पक्षांना समजावून सांगत त्यांच्यात १७२ प्रकरणे तडजोडीअंती मिटविली. आज या जोडप्यांचा संसार सुखाने सूरु आहे. 

जिल्ह्यात कौटूंबीक हिंसाचाराचे प्रमाण अन्य जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. दुभंगलेल्या मनाला एकत्र करून त्यांचा पुन्हा संसार फुलावा यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्ष काम करते. पती- पत्नीच्या वादाचे कारण जर पाहिले तर अत्यंत किरकोळ असते. परंतु ‘ मी '  पणा त्याला कारणीभूत असते. जिल्हाभरातून सन २०१८ मध्ये ६६५ प्रकरणे दाखल झाली. त्यातील १६२ प्रकरणात तडजोड करून दुभंगलेली मने जोडली. २९५ प्रकरणात स्वतंत्र निर्णय घेण्यात आला. दोन्ही पक्ष जर समजत नसल्याने अखेर १३९ प्रकरणे पोलिस ठाणे स्तरावर पाठविण्यात आले. त्यापैकी ४८ प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांचडे वर्ग करून २१ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यासाठी वर्षभरात महिला सहाय्य कक्षाच्या ४१ बैठका घेण्यात आल्या.

तसेच जानेवारी ते सात मार्चपर्यंत १२० प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी १२ प्रकरणात तडजोड करून ३३ मध्ये स्वतंत्र निर्णय देण्यात आला. ११ प्रस्ताव संबंधीत पोलिस ठाण्यात पाठविले. तर चार प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले. ६० प्रकरणे निकाली निघाले तर ६० प्रकरणे सध्या प्रलंबीत आहेत. आजपर्यंत चार बैठका घेण्यात आल्या. 

महिला सहाय्य कक्ष यांच्या बळावर: 
फौजदार आर. एस. शहारे, हवालदार एस. बी. देशमुख, एल. डी. आनेराव, पोलिस नाईक बी. एस. पोदार, पोलिस ए. डी. घोडके, ए. डी. गीरी, के. आर. बंदखडके, एस. बी. जाधव आणि जी. एन. शिंदे यांचा समावेश आहे. 

आज होणार कार्यक्रम: 
महिला जागतीक दिनानिमित्त पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या चींतन सभागृहात पोलिस खात्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार. तसेच कुटूंबात वाद झाल्यानंतर सामोपचाराने मिटविण्यात आलेल्या प्रकरणातील जोडप्यांचा भेटवस्तु देऊन पोलिस अधिक्षक संजय जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचे श्रीमती शहारे यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com