esakal | कोरोना काळात भाजीपाला व्यवसायकांनी तारले अनेक कुटुंब
sakal

बोलून बातमी शोधा

सुनील गायकवाड सेलू

कोरोना काळात भाजीपाला व्यवसायकांनी तारले अनेक कुटुंब

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : गल्लीतून जात असतांना दरवाजा उघडून एका महिलेने बाहेर येऊन पाहिले. ताई भाजी घ्या आताच ताजी आणली आहे. मागील काही दिवसांपासून तुम्ही माझ्याकडून भाजी घेतली नाही. असा प्रसंग येथील शिवाजीनगरातील रहिवाशी सुनिल गायकवाड या भाजी विक्रेत्यासोबत कोरोनाच्या काळात घडला. रोजच्या हातावरल्या व्यवसायाला कोरोनाने दुर केले. परंतु आपुलकीच्या शब्दांनी नियती कोपली पण माणुसकी जिवंत असल्याचे दिसले.

शहरातील शिवाजीनगरातील रहिवाशी सुनिल गायकवाड मागील अनेक वर्षापासुन भाजीपाल्याचा व्यवसाय गल्लोगल्ली फिरुन करतो. मात्र गेल्यावर्षापासुन कोरोना संसर्गजन्य रोगाने राज्यात थैमान घातले. त्यामुळे अनेकवेळा प्रशासनाला लाॅकडाऊनसारखे पर्याय अवलंबवावे लागले. पर्यायाने सर्व व्यवहार बंद झाले. कुठलीही वस्तु मिळणे कठीण झाले. लाॅकडाऊन शिथिल झाले की, सर्वांची एकच झूंबड उडत असे अशा परिस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळुन, सॅनेटाझरचा वेळोवेळी वापर करुन सुनिल गायवाड यांने आपला भाजीपाल्याचा व्यवसाय गल्लोगली फिरुन केला. या काळात अनेकजन भाजीपाला घेण्यासाठी घरात पैसे नसल्याने भाजीपाला विकत घेत नसत, अशा प्रसंगी सुनिल गायकवाड यांनी घरावरील बेल वाजवून तसेच अक्का, वहिनी,काकु, आजी असा रोडवरुन आवाज देवून भाजीपाला घ्या पैसे लगेच देवु नका नंतर द्या असे म्हणून भाजीपाला दिला.

हेही वाचा - अपंग असूनही पुणे पोलिसांसोबत 'ड्युटी' बजावणारा 'राजा

कोरोना महामारीच्या काळात गृहिणींचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे आपला माणुस सुनिल गायकवाड. याचे कारणही तसे खासच आहे. कारण गृहिणींसाठी सगळ्यात जिव्हाळ्याचे असते ते स्वयंपाकगृह व या स्वयंपाकासाठी नित्य नेमाने गरज असते ती ताज्या भाजीपाल्याची. दररोज सकाळी न चुकता ताजा भाजीपाला आम्हाला अविरत पुरवून या काळात आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुनिल भाऊने मोलाचे योगदान दिले आहे. या कठीण काळात आपुलकीचे दोन शब्द व त्याबरोबर ताजा भाजीपाला हे जणू समीकरणच सुनीलच्या रुपाने आम्हाला पहावयास मिळाले.

- त्रिवेणी ढवारे, गृहिणी, सेलू

संपादन- प्रल्हाद कांबळे