ट्रक फसल्याने वाचले अनेकांचे प्राण 

प्रल्हाद कांबळे 
सोमवार, 18 जून 2018

मुकमाबाद (नांदेड) : सोमवार (ता. १८) दुपारी साडे तीन वाजता मुखेड तालुक्यातील दापका (गुडोपंत) येथील तांड्यावरून लग्न अटोपुन ट्रक क्रमांक एम.एच. २६ एच.८०५९  ने  कर्नाटक राज्यातील बोंथी येथे परत येत होता. 

मुक्रमाबाद येथील राज्य मार्गावर देगलूरच्या दिशेने येत असलेल्या भरधाव दुचाकी  स्वारास वाचविण्यासाठी वऱ्हाडानी खचाखच भरलेला ट्रक चालकाने सतर्कता दाखवत राज्य मार्गाच्या खाली उतरवला. त्याक्षणी ट्रक हा तेथील भूसभूसीत असलेल्या साईडपट्टीत फसून बसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात सुदैवाने दुचाकी स्वराचे व ट्रक मध्ये असलेल्या एकाही वऱहाडीनां कसलीच खापत झालेली नाही.

हा, ट्रक जर रोडच्या साईड पट्टीत फसला नसता तर ट्रक पलटी होऊन मोठी जिवीत हानी झाली असती. मुक्रमाबाद येथील युवकानी वेळीच मदत करत ट्रक मधील महीला व नागरीकांना सुखरूप खाली उतरवून त्यांना धीर दिली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढून दिला. ट्रक चालकाच्या सतर्कतेने त्या दुचाकी स्वराचे प्राण वाचले. पण ट्रक फसल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहे.

Web Title: Many people lost their lives in the truck