बदनापूर ते पैठण रस्त्यावरील नानेगाव पाटीवर सकल मराठा समाजाचा रास्ता - रोको

वडीकाळ्या येथील सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाला दिला पाठिंबा
maratha community Rasta Roko Andolan badanapur to paithan traffic
maratha community Rasta Roko Andolan badanapur to paithan trafficsakal

बदनापूर : वडीकाळ्या (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मराठा समाजाच्या प्रश्नावर आमरण उपोषण करीत आहेत. या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बदनापूर - पैठण रस्त्यावरील नानेगाव पाटीवर सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. 31) दुपारी रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

या आंदोलनात नानेगाव, सायगाव, डोंगरगाव, बुटेगाव, कुंभारी, काजळा व बदापूर येथील समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे डोंगरगावचे माजी सरपंच विष्णू घनघाव यांच्यासह काही तरुण वडीकाळ्या येथे उपोषणात देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान, नानेगाव पाटीवर आंदोलकांनी वडीकाळ्या येथे सुरू असलेल्या उपोषकर्त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याबाबत जोरदार घोषणाबाजी करून आसमंत दणाणून सोडला.

या रास्ता - रोको आंदोलनात कृष्णा घनघाव, विशाल घनघाव, शरद घनघाव, प्रशांत चव्हाण, कैलास चव्हाण, दत्ता चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, शुभम औटे, संभाजी गायकवाड, ऋषिकेश चव्हाण, पवन बोचरे, सिद्धेश्वर घनघाव, अनिल घनघाव, गणेश कैलकर, भरत चोरमारे, युवराज शिंदे,

अनिल देशपांडे, शुभम चव्हाण, राम गायकवाड, भगवान बखळे, अप्पासाहेब शिंदे, श्याम गायकवाड, सचिन वाघ, मुकुंद चव्हाण आदींसह असंख्य समाजबांधव सहभागी झाले होते. शेवटी पोलिस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांना निवेदन सादर करून रास्ता - रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com