#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने घेतले विष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

पूर्णा/ताडकळस (परभणी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (ता.25) रात्री आलेगाव (ता.पूर्णा) येथील एका 24 वर्षीय युवकांने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या युवकांवर नांदेड येथील एका खासगी रुग्णायात उपचार सुरु आहेत.

आलेगाव (ता,पूर्णा जि.परभणी) येथील युवक प्रशांत सौरते (वय 24) हा युवक मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय आहे. मराठा समाजाल आरक्षण मिळावे या मागणीसाठी प्रशांत सौराते याने बुधवारी (ता.25) रात्री गावाच्या मुख्य रस्त्यावर येऊन विषारी औषध प्राशन केले. त्याला तात्काळ नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याची प्रकृती अस्वस्थ असून त्याला कृत्रीम श्वासोस्वासावर ठेवण्यात आले आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: maratha kranti morcha 1 boy takes poison