जिंतूरात आमदारांच्या घरासमोर मराठा समाजाचे आंदोलन

राजाभाऊ नगरकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जिंतूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिंतूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार विजय भांबळे यांच्या निवासस्थानासमोर गुरुवारी (ता. 2) मराठा समाजाच्या वतीने भजन आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

लातूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ता.एक ऑगस्ट पासून आमदार, खासदारांच्या निवासस्थानासमोर भजन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार जिंतूर येथे गुरुवारी (ता. 2) सकाळपासून आमदार विजय भाबंळे यांच्या निवासस्थानी मराठा समाजासह भांबळे समर्थकांनी  मोठी गर्दी केली आहे.

मंडप टाकुन समाजाच्यावतीने भजन आंदोलन सुरु झालले आहे. या आंदोलनात आमदार भांबळे यांचे वडील माजी राज्यमंत्री माणिकराव भांबळे हेदेखील सहभागी झाले आहेत.

Web Title: maratha kranti morcha agitation behind mla office