मराठा अरक्षण आंदोलनात गेवराईत जेष्ठही सरसावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असून शुक्रवारी (ता. तीन) गेवराईत वयाची साठी पार केलेल्या ५० च्या वर जेष्ठांनी ठिय्या आंदोलनात सहभागी घेतला आहे. 

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असून शुक्रवारी (ता. तीन) गेवराईत वयाची साठी पार केलेल्या ५० च्या वर जेष्ठांनी ठिय्या आंदोलनात सहभागी घेतला आहे. 

परळी येथे आरक्षण आणि मेगा भरती थांबविण्याच्या मागणीसाठी ता. १६ जुलैला सुरू झालेले ठिय्या आंदोलन शुक्रवारी सतराव्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी आमदार सतीश चव्हाण यांनी आंदोलनाला भेट दिली. जिल्ह्यात रोज विविध मार्गांनी लोकशाही आंदोलने सुरू आहेत. याच मागणीसाठी शुक्रवारी गेवराईच्या शास्त्री चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले. यामध्ये वयाची साठी पार केलेले ५० च्या वर जेष्ठ मंडळींनी सहभाग नोंदविला. अंबाजोगाईत जागरण गोंधळ आंदोलन सुरू झाले आहे. तर, केजमध्येही ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. माजलगाव येथील ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून अडत व्यापाऱ्यांनी बंद पाळून सहभाग घेतला. 

Web Title: maratha kranti morcha agitation at gewarai by senior citizens