#MarathaKrantiMorcha औरंगाबाद जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

महालगाव गटातील जातेगांव टेंभी येथे गावकऱ्यांनी आठवडी बाजार भरु दिला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना येथून परत जावे लागले. बससेवा सुद्धा बंद आहे.

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाची जिल्ह्यात धग कायम असून शहरातील क्रांती चौकातील आंदोलनकर्त्यांचा ठिय्या कायम आहे. जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावांमध्ये बाजारपेठा, दुकाने बंद करण्यात आली आहे. तसेच सकाळपासून शहरासह जिल्ह्यात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. 

महालगाव गटातील जातेगांव टेंभी येथे गावकऱ्यांनी आठवडी बाजार भरु दिला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना येथून परत जावे लागले. बससेवा सुद्धा बंद आहे. पैठण तालुक्‍यातील विहामांडवा, आडुळ, ढोककीन येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील बहुतांश मोठ्या गावात बंद पाळण्यात येत असून जिल्हाभरात आंदोलनाची धग कायम आहे. बुधवारी (ता.25) राज्याच्या विविध भागात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे पडसाद शहरात उमटतील, अशी शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

Web Title: maratha kranti morcha agitation still going on in aurangabad