मराठा आंदोलकांचे टॉवरवर चढून आंदोलन

yedashi
yedashi

येडशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येडशी (जि. उस्मानाबाद) येथील बस स्थानकाच्या शेजारील मोबाईल टॉवरवर काही तरूणांनी शुक्रवारी (ता. 27) आंदोलन सुरू केले. सकाळपासून हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान प्रशासनाला ही माहिती कळताच पोलिस बंदोबस्तासह रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली आहे.

गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दिला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच होते. आंदोलनकर्त्यांमध्ये अतुल मोरे, सुमित नलावडे, अनिकेत पवार, गणेश वीर, प्रसाद पवार, चैतन्य चव्हाण, प्रतिक मोहिते, योगेश चव्हाण, आकाश पवार, अजिंक्य पवार, प्रशांत जगताप, नितीन शिंदे, आदी १२ तरुणांचा समावेश आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉवर चढून आरक्षणासंबधी घोषणाबाजी केली. प्रशासनाकडून या कार्यकर्त्यांना खाली उतरण्याचे आवाहन करण्यात येत होते. तरीही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर गिरी यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका आणून उभी केली. आरक्षणाच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून खाली उतरणार नसल्याची भूमिका आंदोलकनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे उस्मानाबाद ग्रामिण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी ही पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय लोखंडे, उपसरपंच सुधीर सस्ते, जयंत भोसले, संतोष सस्ते, अकबर तांबोळी, तुषार शिंदे, मंगेश देशमुख, सागर देशमुख, भैया लोखंडे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनास पाठींबा देण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com