सोनपेठ - मराठा आंदोलकांनी मानव विकासची बस फोडली

कृष्णा पिंगळे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सोनपेठ (परभणी) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच मराठा लोकांवर दाखल केलेले गुन्हे वापस घेण्यात यावेत या मागणी साठी तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन चालू असतांनाच (ता.3) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील कोठाळा पाटीवर अज्ञात लोकांनी दगडफेक करून मानव विकासची बस फोडल्याची घटना घडली आहे. 

सोनपेठहुन गंगाखेड येथे जाणारी मानव विकासची बस सकाळी कोठाळा पाटीवर पोहोचताच शेतात दडून बसलेल्या काही अज्ञात इसमानी थेट बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये असणारे प्रवाशी सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र बसच्या समोरील व बाजूच्या काच  फुटून बरंच नुकसान झाल्याचे वाहक व्यंकट गवळी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून चालणाऱ्या आंदोलनामुळे गंगाखेड आगाराची बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे मानव विकासची बस चालू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबधित बसवर दगडफेक झाल्यानंतर ती बस थेट सोनपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. अज्ञात दगडफेक करणारांवर सोनपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: maratha kranti morcha agitators destroy bus