पांडुरंगाच्या खांद्यावर ठिय्यातील झेंडा 

अतुल पाटील
गुरुवार, 26 जुलै 2018

औरंगाबाद : कपाळी गंध.. वाढलेली दाढी.. आत गेलेल पोट.. अंगात राखाडी रंगाचे स्वेटर अन्‌ खांद्यावर शिवरायांचे चित्र असलेला भगवा झेंडा असाच काहीसा पेहराव असलेला तरुण ठिय्या आंदोलनस्थळी लक्ष वेधून घेत आहे. तो दुसरा-तिसरा कोणी नसून दैठणा खुर्द (ता. परतुर, जि. जालना) येथे शिवरायांचे मंदिर बांधणारा पांडुरंग पाटील आहे. 

क्रांती चौकात सात दिवसांपासून ठिय्या आंदोलन, उपोषण सुरु आहे. पांडुरंग हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी सौंदर्य बेटावर दोन दिवस बसून होते. त्यानंतर ठिय्यासाठी उभारलेल्या मंडपात पाच दिवसांपासून बसले आहेत. पांडुरंग यांचा आंदोलनातील सातवा दिवस आहे. इतक्‍या दिवसात केवळ दोन वेळेसच जेवण केले असून यादरम्यान, साडेचार किलो वजन कमी झाले आहे. एकदा सलाईनदेखील लावली आहे. त्यांच्या रक्‍तदाबाची तपासणी नित्याने डॉक्‍टर करत आहेत. 

चौथीत असतानाच गाव सोडून औरंगाबादेत राहणारे पांडुरंग यांनी एमसीव्हीसीमध्ये ऑटो इंजिनिअरींगपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. किराणा दुकान, टॅव्हल्स्‌ कंपनीत व्यवस्थापक असा प्रवास करत आता ते खासगी वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. 

"विद्यार्थ्यांना शुल्क भरणे कठीण होऊन बसले आहे. आरक्षणाबाबत ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत इथून उठणार नाही. लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. आरक्षण देणे जमत नसेल तर, मुख्यमंत्र्यांनी तसे सांगावे. विना इशाऱ्याची आंदोलने केली जातील.'' 
- पांडुरंग पाटील, उपोषणकर्ता

Web Title: maratha kranti morcha aurangabad