#MarathaKrantiMorcha मागण्यांची दखल न घेतल्यास नऊपासून गावोगावी ठिय्या 

#MarathaKrantiMorcha मागण्यांची दखल न घेतल्यास नऊपासून गावोगावी ठिय्या 

परळी वैजनाथ - मराठा समाज आरक्षणासह अन्य मागण्यांची सरकारने मंगळवारपर्यंत (ता. 7) दखल न घेतल्यास क्रांती दिनापासून (ता. 9) राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. 

उपविभागीय कार्यालयासमोर 18 जुलैपासून सुरू असलेलल्या ठिय्या आंदोलनाचा आज सोळावा दिवस होता. त्याचा आढावा व पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील समन्वयकांची येथे बैठक झाली. त्याला 26 जिल्ह्यांतील समन्वयक उपस्थित होते. पाटील यांनी बैठकीची माहिती दिली. 

या आहेत मागण्या... 
- आरक्षणासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. 
- आरक्षणानंतरच महानोकर भरती करावी. 
- आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. 
- आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत द्यावी. 
- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली उपसमिती बरखास्त करावी. 

"कायदा हाती घेऊ नका' 
मागण्यांची दखल न घेतल्यास क्रांती दिनापासून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. त्या वेळी रस्त्यावरील आंदोलन थांबवून कार्यकर्त्यांनी ठिय्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, कायदा हातात घेऊ नये; दगडफेक, जाळपोळ करू नये, आत्महत्या करू नये, मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने लढा देऊ या, असे आवाहन समन्वयक पाटील यांनी केले. 

डॉ. भापकर तळ ठोकून 
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर गेल्या दोन दिवसांपासून परळीत तळ ठोकून आहेत. ठिय्या आंदोलनात सहभागी प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या विश्रामगृहावर त्यांनी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनाबाबत माहिती दिली. मात्र कार्यकर्ते मागण्यांवर ठाम असल्याने भापकर यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com