बीडमध्ये डॉक्टरांचा ठिय्या; रक्तदान आंदोलनाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

शहरातील डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्राशी संबंधीत मंडळींनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी (ता. सात) ‘सकल मराठा वैद्यकीय विभागाच्या वतीने’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. रक्तदान शिबीरालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

शहरातील डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्राशी संबंधीत मंडळींनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावे, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण व राहण्यासाठी हॉस्टेलची तत्काळ निर्मिती करून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दरवर्षी दहा हजार कोटी रूपये निधी उपलब्ध करून द्यावा, आत्महत्याग्रस्त मराठा समाजाच्या कुटूंबातील पाल्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कुठलीही शासकीय, निमशासकीय नोकरभरती शासनाने करू नये आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, आरक्षण मागणीसाठी रक्तदान आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुपार पर्यंत पाचशेच्या पुढे दात्यांनी रक्तदान आंदेालनात सहभाग घेतला. 

Web Title: Maratha Kranti Morcha doctors strike in Beed