मराठा क्रांती मोर्चा; परळीत चौथ्या दिवशीही ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

वडवणी/परळी : मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (ता.20) माजलगाव येथे रास्ता रोकोदरम्यान पोलिसांनी युवकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. 21) वडवणीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून बाजारपेठ बंद आहे. तर, परळीत बुधवार (ता. 18) पासून सुरु झालेले ठिय्या आंदोलन शनिवारी (ता.21) चौथ्या दिवशीही सुरुच आहे. 

मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यानंतरच मेगा भरती सुरु करावी या मागणीसाठी परळीत बुधवारी पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघून ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलनाला विविध भागातून पाठींबा मिळत आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवारी माजलगाव येथील परभणी फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी युवकांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

याच्या निषेधार्थ शनिवारी सकाळ पासून वडवणीत बंद पाळण्यात आला. मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. व्यापाऱ्यांनीही बंदला प्रतिसाद दिला. आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चाटे चौक दरम्यान पायी फेरी काढली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti morcha, forth day stay in parali