नाशिकच्या बैठकीतच 'मराठा आरक्षण' आंदोलनाची पुढील दिशा ! 

0maratha_morcha_9.gif
0maratha_morcha_9.gif

जालना : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढची दिशा ही  शनिवारी (ता.२६) नाशिक येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांच्या बैठकीनंतर ठरविली जाईल. असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांची शुक्रवारी (ता.२५) जालना शहरातील भाग्यनगर येथील मराठा सेवा संघ कार्यालय येथे बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काही निर्णय जाहीर केले आहेत. मात्र, या निर्णयावरही समाजाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. मात्र,  नाशिक येथे शनिवारी (ता.२६) राज्यातील सर्व जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होईल त्यानंतर जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच नाशिक येथील बैठकीनंतर जिल्ह्यात आमदार, खासदार यांच्या घरासमोर ढोल बाजावो आंदोलन केले जाईल, असे ही या बैठकीत ठरले. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मराठा महासंघाच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांना मराठा आरक्षण मागणीचे निवेदन देऊन घेरावा घालण्याचा प्रयत्न झाला होता. या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत, त्याचा निषेध करीत हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, असा ठार घेण्यात आला. तसेच  नवीन पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन हे गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन ही देण्यात येणार आहे, असे या बैठकीत ठरले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com