Maratha Kranti Morcha एसटीची सेवा पुर्णपणे बंद

अनिलकुमार जमधड़े
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे राज्य परिवहन मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार (ता.9) सर्व सेवा बंद ठेवली आहे.

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मध्यरात्रीनंतर सर्व बस बंद करण्यात आल्या. औरंगाबाद विभागाच्या बाहेरगावी गेलेल्या बस गाड्या काही प्रमाणात विविध आगारांमध्ये अडकून पडल्या आहेत.

औरंगाबाद विभागातुन पहाटेपासून एकही बसगाडी पाठवण्यात आली नाही, आणि अन्य कुठलाही विभागाची एकही गाडी औरंगाबादला आली नाही असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Maratha Kranti Morcha Maharashtra Bandh MSRTC