Maratha Kranti Morcha : आंदोलनकर्त्यांनी मारला पिटलं भाकरीवर ताव

हरी तुगावकर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी लातूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळपासूनच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे सकाळी चहा पिऊन घराच्या बाहेर पडलेल्या या कार्यकर्त्यांसाठी जेवणाची सोय व्हावी म्हणून दुपारी शिवाजी चौकातच चूल पेटविण्यात आली. मराठी क्रांती मोर्चाच्या महिलांनी केलेल्या पिटलं भाकरीवर या कार्यकर्त्यांनी ताव मारत पुन्हा
आंदोलन सुरु केले. जेवण झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना पाण्याची सोय करण्यात आली होती.

सकाळी सहा सात वाजल्यापासून कार्यकर्ते घराच्या बाहेर पडले होते. अनेक जण घरी केवळ चहा पिवूनच बाहेर पडले होते. शहरात कडकडीत बंद राहिल्याने दुपारपर्यंत त्यांना काहीही खायला प्यायला मिळाले नाही. पण आंदोलनात घोषणा देताना तरुणांचा जोष मात्र कायम होता. दुपारच्या वेळी भूक लागणार हे लक्षात घेवून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवाजी चौकातच चूल मांडण्यात आली. चौकातच स्वयंपाक करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या महिलांना पिटलं भाकरीचा स्वयंपाक केला. पाचशे पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी यावर ताव मारला. शहरात ठिकठिकाणी तरुणांना जेवणही देण्यात आले. शिवाजी चौकात जेवण झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने पाण्याची सोय करण्यात आली होती. जेवण केल्यानंतर पुन्हा तरुण आंदोलनात सहभागी झाले. पुन्हा त्यांचा जोश वाढला गेला.
 
Web Title: Maratha Kranti Morcha : maratha agitation in latur