Maratha Kranti Morcha : वलांडी येथे रास्ता रोको आंदोलन

बाबासाहेब उमाटे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

देवणी (जि.लातूर) : तालुक्यासह परिसरात गुरुवारी (ता. 09) मराठा अंदोलनानिमित्त उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात आला. गुरुवारी सकाळपासुनच गावागावातील चौकातील रस्ते पुर्णपणे बंद करीत रस्त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. देवणी, वलांडी, धनेगाव, जवळगा, बोरोळ यासह सर्वच ग्रामीन भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासुनच बंद ठेवीत अंदोलनास पाठींबा दिला. वलांडी येथील मुख्य चौकात बॅरीकेट्स लावुन वाहुन रस्त्यावर आडवी लावीत रस्ता बंद करण्यात आला. बोंबळी, धनेगावसह ग्रामीन भागातील तरुणांनी दुचाकीवरुन रँली काढीत येऊन वलांडी येथील मुख्य रास्ता रोको अंदोलनास पाठींबा दिला.

तरुणांनी सरकारविरोधी घोषणा देत अंदोलनात उत्स्फुर्त प्रतीसाद दिला. शेतकऱ्यांनी आपली बैलजोड्या व शेळ्यासह अंदोलनात सहभाग घेतला. देवणी व वलांडी येथे परिसरातील युवकांनी एकत्रीत येत अंदोलनात सहभाग नोंदवला. गेल्या तीन चार दिवसापासुन तालुक्यातील मराठा समाजाच्या समन्वयकांनी अंदोलनासंदर्भात सुक्ष्म नियोजन केल्याने तालुक्यातील अंदोलन यशस्वीपणे पार पडले.

Web Title: Maratha Kranti Morcha : maratha agitation road block in valandi