Maratha Kranti Morcha : मराठा समाजाचा आमदार म्हणून घ्यायला लाज वाटते...

हरी तुगावकर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

लातूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांती दिनी (ता.नऊ) आयोजित महाराष्ट्र जनआंदोलनाला लातूर येथे मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात मराठा समाजातील आमदारावर तरुणांचा रोष दिसून येत आहे. यात एक तरुणाने तर स्वतःच्या तोंडाला काळे फासून अंगाला वॉर्निस लावून स्वतःच्या अंगावर `मी मराठा आमदार ` असे लिहून निषेध नोंदविला. हा तरुणा सर्वांचे लक्ष वेधून घेत
होता.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात मराठा समाजातील
आमदारावर जास्त रोष व्यक्त केला जात आहे. हे आमदार विधीमंडळात
आरक्षणाच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत त्यामुळे तरुणात त्यांच्याविषयी
असंतोष आहे. आजच्या आंदोलनातही दिसून आले. स्वतःच्या तोंडाला काळे फासून
अंगावर मी मऱाठा आमदार असे लिहून हा तरुण आंदोलनात सहभागी झाला होता.
त्याच्या हातात एक पोस्टरही होते. त्यावर `मी मराठा आमदार, ज्या समाजाने
मला निवडूण दिलं ज्या समाजामुळे मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली त्या
समाजासाठी मी माझा राजीनामा, माझे पद सोडू शकत नाही, माझ्या समाजाच्या
हक्कासाठी रस्त्यावर उतरू लढू शकत नाही, अशा मराठा समाजाचा मराठा आमदार
म्हणून घेण्यास मला लाज वाटते असे लिहले होते. यावरून आमदारांविषय़ी किती
तीव्र भावना आहेत हे लक्षात येत होते.

Web Title: Maratha Kranti Morcha : Maratha community's youth rage