मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

Maratha-Reservation
Maratha-Reservation

गेवराई (बीड) - मराठा आरक्षणासाठी इरगाव (ता. गेवराई) येथे आप्पासाहेब सुंदरराव काटे (वय 32) या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आप्पासाहेब यांनी शनिवारी दुपारी शेतात विष घेतले होते. रविवारी (ता. दोन) सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान "मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत आहे', अशा आशयाची चिठ्ठी आप्पासाहेब यांच्या खिशात आढळल्याने संतप्त नातेवाईकांनी न्याय मिळावा, अशी मागणी करीत मृतदेह गेवराई पोलिस ठाण्यात आणला. मृताच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्यावी, घरातील एकाला शासकीय नोकरीत घ्यावे, प्रशासनाला आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्यांची जाणीव करून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com