आमदार-खासदारांच्या तोंडाला काळे फासणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

विकास गाढवे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

लातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्याप्ती ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार आणि खासदार सहभागी न झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मोर्चाच्या वतीने शनिवारी (ता. 4) शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या येथील निवासस्थानासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनातून देण्यात आला. आंदोलनाची पू्र्वकल्पना देऊनही आमदार काळे उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. वडील स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे यांचा वसा वारसा स्वतःमध्ये रूजवावा, असा सल्ला देण्यासही कार्यकर्ते विसरले नाहीत.   

सकाळी अकराच्या सुमारास एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत व घंटानाद करीत आमदार काळे यांच्या घरासमोर आंदोलन सुरू झाले. त्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी प्राणांची बाजी लावलेल्या जिल्ह्यातील सुमित सावळसुरे व नववाथ माने यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आंदोलनाची पूर्वकल्पना असतानाही उपस्थित न राहिल्याने आमदार काळे यांचा आंदोलकांनी निषेध केला. स्वकीयांच्या अशा भूमिकेनेच समाजाचे वाटोळे झाले असून अशा वृत्तीचे राजकारणी हे समाजाचे खरे शत्रू असल्याची भावना अनेकांनी मनोगतातून व्यक्त केली. एकीकडे आरक्षणासाठी तरूण जीवाचे बलीदान देत असताना दुसरीकडे मराठा लोकप्रतिनिधी गप्प आहेत. आरक्षण मिळवून देण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीही त्यांच्याकडे नाही. हे आंदोलन त्यांचे नाही? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.

क्रांती दिनी होणारे ठिय्या आंदोलन आंदोलन हे शासनाच्या उरात धडकी भरेल, या पद्धतीने करण्याचा तसेच त्यासाठी गावागावात आणि वाड्यातांड्यावर  संदेश पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला. या आंदोलनात मराठा समाजातील आमदार व खासदार सहभागी न झाल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. काही आंदोलनकर्त्यांनी आमदार काळे यांचे वडिल स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी शिक्षण, शेती, शेतकरी व ग्राम विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करून आमदार विक्रम यांनी वडीलांचा हा वसा वारसा स्वतःत रुजवावा, असा सल्ला आंदोलनकर्त्यांनी दिला. आरक्षणाची ही लढाई आरक्षण  मिळेपर्यंत सुरुच राहणार असल्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. आंदोलनात आमदार काळे यांचे शेजारी माजी आमदार वैजनाथ शिंदे यांचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. आंदोलनाच्या वेळी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: maratha kranti morcha mla mp