'एक मराठा, लाख मराठा' चा निनाद ! आरोग्यमंत्री टोपे यांच्या घरासमोर धरणे आंदोलन. 

सुभाष बिडे
Friday, 2 October 2020

सकल मराठा क्रांती मोर्चा घनसावंगी यांच्या वतीने आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या घरासमोर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.  

घनसावंगी  (जालना) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सकल मराठा समाजच्या वतीने  सार्वजनीक आरोग्य व कुटूंबकल्याण तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगी येथील निवासस्थानासमोर शुक्रवारी (ता.दोन) धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'एक मराठा, लाख मराठा' असा जयघोष करण्यात आला. आमदारांनी आरक्षणास पाठीबा देण्याची मागणी  करण्यात आली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने धरणे  आंदोलन करून ठिय्या मांडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण देऊ नये, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्यावी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती कुठेपर्यंत राज्य शासनाने कुठल्याही विभागातील नोकरभरती प्रक्रिया करू नये, मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक आणि तरुणांवरील राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्यावे, २०१९ मध्ये एमपीएससीमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करावी, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजासाठी १२ टक्के जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी, राज्यपालामार्फत राष्ट्रपतींकडे एसईसीबी प्रवर्ग १०२ घटनादुरुस्तीनुसार नोटीफायर करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा, ओबीसीचा कोटा वाढवून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश कारावा, सारथीच्या संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करून १०० कोटीचा निधी द्यावा, मराठा विध्यार्थींच्या शैक्षणिक फीची जबाबदार राज्य शासनाने घ्यावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान पालक मंञी राजेश टोपे यांचे स्वीयसहाय्यक हनुमंत खोसे व अशोक शिंदे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठा आरक्षणाच्या मागणी करीता बीड येथील तरुण विवेक कल्याण रहाडे यांनी आत्महत्या केली. त्यास श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर उढाण, कैलास खांडेभराड, भागवत रक्ताटे, कल्याण कोल्हे ,अरविंद घोगरे, युवराज आर्दड, विकी शिंदे, वसंत दाभाडकर, कारभारी सपाटे , गंगाधर आनंदे,गणेश ढेरे,  जगन्नाथ काकडे, सुरेश आर्दड, गणेश काळे , संतोष जाधव, विजय कंटूले, विलास कोल्हे  यांच्या सह अनेकाची उपस्थिती होती.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Movement in GhanSavangi News