मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी औरंगाबादेत बैठक

अतुल पाटील
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्य मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपुर्वी न्यायालयात सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (ता. 14) औरंगाबादेत महत्वपुर्ण बैठक होत आहे. आरक्षण आणि शेतकरी प्रश्‍नांसाठी 16 नोव्हेंबरपासून मराठा संवाद यात्रेचे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे, अशी माहिती समन्वयकांनी दिली. 

औरंगाबादेत गुलाब विश्‍व कार्यालय, हडको येथे बुधवारी (ता. 14) सकाळी अकरा वाजता बैठकीला सुरवात होणार आहे. संवाद यात्रेचे नियोजन व मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यावर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीला तालुका, जिल्हा समन्वयकांनी तसेच सर्व क्षेत्रातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. "मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्व समाज बांधवानी उद्याच्या बैठकीला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती' असे संदेशही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या राज्य मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सादर केला जाईल, असे न्यायालयात सरकारतर्फे सांगण्यात आले होते. न्यायालयाने दिलेली मुदत कए दिवसांनी संपत असून मराठा समाज पुन्हा आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले, सरकारविरोधात आंदोलने केली, समाजातील तरुणांनी जीवही दिले. या पार्श्‍वभूमीवर या बैठकीला महत्व आहे. 

Web Title: Maratha Kranti Morcha organized a meeting in Aurangabad on Wednesday