Maratha Kranti Morcha :परभणीत रेल्वेवर दगडफेक, पाच गाड्या रद्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

परभणी - जिल्ह्यातील पुर्णा ते चुडावा दरम्यानच्या रेल्वे गेटवर रेलरोको आंदोलन करण्यात आले. त्याला हिंसक वळण प्राप्त झाल्याने गेटमनला मारहाण झाली असून, त्याच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली आहे.

दुपारी साडेबारा वाजता आंदोलक या गेटवजवळ गेले. त्यांनी गेटमनचा मोबाईल हिसकावून घेत अमरावती ते तिरूपती रेल्वेवर दगडफेक केली. 

दरम्यान, आदीलाबाद ते परळी गाडी थांबवून काही जण डब्यांत घुसले. त्यांच्याकडून आतील काही साहित्याची तोडफोड करण्यात आली. परिणामी, नांदेड-परभणी (रेल्वे क्र.५७५६१), अकोला-परळी (रेल्वे क्र.५७५४०), परळी-अकोला (रेल्वे क्र.५७५१२), मनमाड-काचीकुडा (रेल्वे क्र.५७५६२) रेल्वे परभणी ते नांदेड दरम्यान रद्य करण्यात आल्या आहेत. तसेच औरंगाबाद ते हैदराबाद रेल्वे जालन्यापासून पुढे रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha :parbhani : attached on railway