Maratha Kranti Morcha : लातूर बसस्थानकाभोवती पोलिसांचे सुरक्षा कडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

लातूर - आंदोलनादरम्यान बसची तोडफोड होऊ नये लातूरमधील मुख्य बसस्थानकातून गुरूवारी एकही बस सोडण्यात आली नाही. सर्व बस शिवाजी नगरमधील आगारात आणि अंबाजोगाई रस्त्यावरील वर्कशॉपमध्ये उभ्या करण्यात आल्या. इथे घुसून तोडफोड होऊ नये म्हणून खासगी सुरक्षारक्षकांबरोबरच पोलिसांचे सुरक्षा कडे तयार करण्यात आले होते. त्यामुळे आंदोलनादरम्यान एकाही बसची तोडफोड झाली नाही.

मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर बंद पुकारण्यात आला आहे. लातूरातही या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लातुर बस स्थानकातून एकही बस रस्त्यावर सोडायचे नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील बस सेवा दिवसभर ठप्प होती. यामुळे अनेक प्रवाशांचे हालही झाले.

लातूरमधून दररोज ४६५ बस ये-जा करतात. या सर्व बस रात्रीच (ता. ८) आगारात आणि वर्कशॉपमध्ये थांबविण्यात आल्या. ज्या बाहेरगावी गेल्या आहेत, त्यांना त्या-त्या स्थानकावर थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे एकही बस मार्गस्थ झाली नाही. आगाराला आणि वर्कशॉपच्या प्रवेशद्वाराला बाहेरून कुलूप लावण्यात आले. कुलूप तोडून आतील बसची तोडफोड होऊ नये म्हणून पोलिस, सुरक्षारक्षक यांना तैनात करण्यात आले होते. दरम्यान, या बंदमुळे महामंडळाचे दिवसभरातील ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती महामंडळाच्या लातूर विभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Maratha Kranti Morcha : Police security near Latur bus stand