'प्रहार'चे पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन

आनंद इंदानी
मंगळवार, 31 जुलै 2018

बदनापूर (जालना) : बदनापूर तालुक्यात मराठा आरक्षणाची धग वाढतच आहे. बदनापूर येथे बाजार समिती मधील जलकुंभावर चढून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 31) दुपार पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

बदनापूर (जालना) : बदनापूर तालुक्यात मराठा आरक्षणाची धग वाढतच आहे. बदनापूर येथे बाजार समिती मधील जलकुंभावर चढून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 31) दुपार पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, आरक्षणाच्या मुद्यावर आमदार - खासदारांनी राजीनामे द्यावेत. अशा प्रमुख मागण्यांसाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढून 'प्रहार' च्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सावळाहरी शिंदे, प्रदिप शिंदे, योगेश निंबाळकर, बद्रीनाथ मोरे, नारायण मिसाळ सहभागी झाले आहेत. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी नायब तहसीलदार एस. आर. शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोलकर यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आंदोलनस्थळी येऊन चर्चा करीत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेतली. आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी भेट दिली.  आंदोलनस्थळी पोलिस मुख्य जमादार इब्राहिम शेख, नितीन ढिलपे, रामप्रसाद केवट, गजानन भवरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: maratha kranti morcha prahar agitation