सोलापूर- औरंगाबाद महामार्गावर मराठा समाजाचे रास्तारोको

नेताजी नलवडे
सोमवार, 23 जुलै 2018

वाशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता. २३) सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पार्डी फाटा (ता. वाशी, जि. उस्मानाबाद) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वाशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता. २३) सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पार्डी फाटा (ता. वाशी, जि. उस्मानाबाद) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सकाळी अकराच्या सुमारास आंदोलनाला सुरवात झाली. आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांनी स्वीकारले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, तुळजापूर येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या मराठा समाजाच्या तरुणांना अरेरावीची भाषा करणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काच- नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करीत आहे. गेल्या वर्षभरात सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात जवळपास 57 मोर्चे शांततेत काढुन आरक्षणाची मागणी केलेली आहे. मात्र शासन या आरक्षणाच्या प्रश्नाकडे  गांभीर्याने पाहात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ समाजावर आली असल्याचे मत सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आले. यावेळी परिसरातील सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: maratha kranti morcha rastaroko at aurangabad solapur high way