जालना - सिपोरा बाजार येथे रास्त रोको

दीपक सोळंके
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

भोकरदन (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 2) सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुक्यातील सिपोरा बाजार येथे भोकरदन- जाफराबाद मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले.

भोकरदन (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 2) सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुक्यातील सिपोरा बाजार येथे भोकरदन- जाफराबाद मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले.

यावेळी राज्य शासन व मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्या, या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाचा लढा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (ता. 2) सकाळी सिपोरा बाजार येथे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते भोकरदन- जाफ्राबाद मुख्य रस्त्यावर जमा झाले. मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारच्या विरोधात संतापजनक घोषणा देत 'एक मराठा लाख मराठा' च्या आवाजाने परिसर दणाणून सोडला. दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे भोकरदन, जाफराबाद, माहोरा, बुलडाणा तसेच विदर्भाकडे जाणारी-येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने प्रशासनाकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

Web Title: maratha kranti morcha rastaroko at jalna