उस्मानाबाद - वाशी येथे मराठा आंदोलकांचा रास्तोरोको

नेताजी नलवडे
मंगळवार, 31 जुलै 2018

वाशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोलापुर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर सरमकुंडी फाटा ता.वाशी येथे मंगळवार (ता. 31) रोजी महामार्ग अडवुन रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी महामार्गावर दुतर्फा वाहानांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.निवेदन नायब तहसिलदार भालचंद्र यादव यांनी स्वीकारले.यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवार (ता.३०) रोजी सरमकुंडी फाटा दिवसभर बंद ठेवण्यात आला होता.

सरमकुंडी फाटा हा खवा व पेढ्यासाठी महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे.येथे दररोज खवा व पेढ्याची खरेदी विक्रीतुन लाखो रुपयांचा व्यवहार होतो.येथील खवा परराज्यातही जातो.सोमवारी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवलेल्या व्यापा-यांनी रास्तारोको दरम्यान दुस-या दिवशीही आपली दुकाने बंद ठेऊन मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपली जिवन याञा संपवुन  बलीदान दिलेल्या सात युवकांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच.मराठ्यांना आरक्षण मिळालच पाहिजे कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहात नाही अशा घोषनानी सकल मराठा समाजाच्या नागरीकांनी परिसर दणानुन सोडला होता.

यावेळी सकल मराठा समाजाच्या युवककांनी आपले विचार व्यक्त करताना सांगीतले की, मराठा समाज मागील अनेक वर्षापासुन आरक्षणाची मागणी करत आहे.मागील वर्षभरात सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात जवळपास ५८ मोर्चे शांततेत काढुन आरक्षणाची मागणी केलेली आहे.माञ शासन या आरक्षणाच्या प्रश्नाकडे  गांभीर्याने पाहात नसल्याचे दिसुन आलेले आहे.त्यामुळे मुक मोर्चा नतर ठोक मोर्चा रास्तारोको आंदोलने करावी लागत आहेत.

नऊ ऑगस्ट पासुन हे आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या युवकांनी यावेळी दिला आहे. यावेळी शासनाने तात्काळ मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी परिसरातील सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Web Title: maratha kranti morcha rastaroko at washo oasmanabad