नांदेड - मराठा आंदोलनामुळे आमदुरा येथे तणावाची स्थिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुदखेड, उमरी नायगाव या सीमावर्ती तालुक्यातही आज आंदोलन पुकारण्यात आले आहे. आमदुरा (ता.मुदखेड) येथे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

आमदुरा येथे आंदोलकांनी दगडफेक करून पोलिस व्हॅन फोडली. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधराची नळकांडे फोडण्यात आली. त्यामुळे जमाव पांगला. तरीही परिस्थिती नियंत्रणात नाही. उमरी, धर्माबाद व नायगाव या तालुक्यांचा संगमाच्या ठिकाणी तिन्ही तालुक्यातील अधिकारी व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

नायगांव तालुक्यात आज जलसमाधी आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.
राहेर येथे राज्य राखीव दलाच्या तुकडया तैनात करण्यात आले आहे.
गोदावरी नदीपात्रावर आंदोलकiना रोखण्यासाठी बॅरीकेट्सचा वापर करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे, देगलूरचे पोलिस उपाधिक्षक सरोदे, धर्माबादचे सहायक पो.अधिक्षक नुरुल हसन, तीन पोलिस निरीक्षक, चार एपीआय व  सहा पीएसआय यांच्यासह 200 जणांचा ताफा सज्ज झाला आहे. जिल्हा प्रशासनाने बोटीसह पाणबुडे व इतर लोक सज्ज ठेवण्यात आले आहे.

Web Title: maratha kranti morcha sensitive situation in aamdura nanded