Maratha Kranti Morcha : शिवाजी महाराज पुतळा बनला आंदोलनाचे केंद्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नांदेड : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज पुकारण्यात आलेल्या बंदला नांदेड शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला. सकाळपासून शहर कडकडीत बंद होते. 
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शहरातील आंदोलनाचे केंद्र बनला होता. या ठिकाणी 'आरक्षण आमच्या हक्काचे..नाही कुणाच्या बापाचे', एक मराठा, लाख मराठा, आदी घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. महिला, युवकांची संख्या लक्षणीय होती. शहराचे केंद्र असलेला हा चौक चारही बाजूंनी झाडे व वाहने आडवी लावून बंद केला होता. 

त्यामुळे शहर ठप्प झाले. त्याचपध्दतीने शहरात प्रवेश करणार्या सिडको, मालेगाव रोड, पूर्णा रोड, आसना बायपास, देगलूर नाका, हिंगोली गेट, शिवाजीनगर उड्डाणपूल, आरटीओ कॉर्नर आदीसर्व चौकांतही आंदोलकांनी रस्ते अडविल्याने वाहतूक बंद होती. नागरिकांना गल्लीबोळांतून वाहने दामटावी लागली. कांही ठिकाणी छोट्या रस्त्यांवरही टायर्स पेटविले होते. झाडे तोडून रस्ते बंद करण्यात आले. या संपूर्ण परिस्थितीमुळे नांदेड शहर आज पूर्णपणे बंद राहिले. पेट्रोलपंप, शाळा, कार्यालये आदी बंद राहिले.

Web Title: Maratha Kranti Morcha : Shivaji Maharaj statue became the center of protest