Maratha Kranti Morcha : क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबरला श्रद्धांजली सभा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे.

औरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे.

याबाबत गुरुवारी (ता.सहा) सायंकाळी सिडकोतील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणात क्रांती मोर्चाची बैठक झाली. यावेळी पहिल्या मोर्चाची मुहूर्तमेढ, दोन वर्षांहून अधिक काळ कसे-कसे मूक मोर्चे झाले, त्याकडे दुर्लक्ष केल्याने कसा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, समाजाने स्वत:ला कसे झोकून दिले, एकतेची ताकद काय असते याचे दर्शन समस्त देशवासीयांना कसे झाले, याचा आढावा घेण्यात आला. मात्र, मूक मोर्चा ते आक्रमक आंदोलनात समाजातील तरुणांनी दिलेल्या बलिदानामुळेच आरक्षणासारख्या लढ्यास यश आले. यामुळे जेथून पहिल्या मूक मोर्चास सुरवात झाली त्याच क्रांती चौकात कोपर्डी येथील भगिनीस तसेच मोर्चात बलिदान दिलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल, असा ठराव घेतला. तसेच मराठा बांधवांसह मोर्चात सहभागी झालेले सर्व जातिधर्मांच्या व्यक्‍ती, न्यायव्यवस्था, विरोधी पक्ष, सरकार या सर्वांचे आभारही व्यक्‍त केले जाणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. सभेस मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले.

Web Title: Maratha Kranti Morcha Tribute meeting