वडवणीत मोर्चा; गेवराईत आंदोलकांची धरपकड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

वडवणी/गेवराई : मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत शासनाची मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी जिल्ह्यात नऊ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन थांबायला तयार नाही. गुरुवारी (ता. 26) वडवणीत सकल मराठा समाजाने मोर्चा काढला. तर, गेवराईत पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु कली आहे.

बुधवार (ता. 18) पासून परळीत सुरु झालेले ठिय्या आंदोलन गुरुवारी (ता. 26) नवव्या दिवशीही सुरुच होते. याच्या समर्थनार्थ जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. गुरुवारी वडवणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. तालुकाभरातून हजारोंचा सहभाग असलेला मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर पोचला. भगवे झेंडे हाती असलेल्या मोर्चेकऱ्यांनी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, देत कसे नाही घेतल्या शिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणा दिल्या. मोर्चेकऱ्यांना मुस्लिम समाज बांधवांकडून चहा - पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, बुधवारी (ता. 26) गेवराईत तिव्र आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे.

Web Title: maratha kranti morcha in wadawani beed