Maratha Kranti Morcha : आरक्षणासाठी युवकाने घेतला गळफास, प्रकृती चिंताजनक

योगेश पायघन 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून रवींद्र साहेबराव जाधव (वय 25 रा मुंडवाडी ता कन्नड) या युवकाने गुरुवारी  (ता 9) साडे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. मात्र शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्याचा गळफास कापून त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून रवींद्र साहेबराव जाधव (वय 25 रा मुंडवाडी ता कन्नड) या युवकाने गुरुवारी  (ता 9) साडे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. मात्र शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्याचा गळफास कापून त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहिती नुसार, रवींद्रला आजच्या मराठा आंदोलनाला जायचे होते पण घरच्यांनी विरोध केला. खूप प्रयत्न करून आरक्षणामुळे नोकरी मिळत नाही याचा संतापातून दुपारी साडे बाराच्या सुमारास घराच्या पत्राच्या दांड्याला दोराच्या साह्याने फाशी लावून घेतली. मात्र छताची उंची सात फुटच होती त्यामुळे त्याचे पाय जमिनीला टेकले. व तो तडफडत असतांना 
भाऊ राजू जाधव व रामेश्वर घनकर यांच्यासह शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी दोरी विळ्याने कापून त्याला दवाखान्यात हलवले. कन्नड ग्रामीण रुग्णालयाने प्रथमोपचार करून त्यांना घाटीत रेफर केले. दरम्यान 100 वर्षाचे आजोबा खुर्चीवर बसून होते मात्र त्यांना दिसत नसल्याने त्यांच्या हा प्रकार लक्षात आलं नाही. 12 वि शिकलेला रवींद्र नोकरीच्या शोधात होता. 

डॉक्टर म्हणाले...

गळ्यावर फासाचे निशाण आहे सिटी स्कॅन करून त्याला आयसीयूमध्ये शिफ्ट करणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भारत सोनवणे यांनी सांगितले. ब्रेन ला हायपोक्सिया ची शक्यता असते त्यामुळे पुढील 24 तास चिंतेचे असतात असेही ते म्हणाले. कान नाक घसा तज्ज्ञ डॉ जैन, डॉ सुरेश हरबडे, डॉ आनंद बिडकर यांनी तपासून
मानेच्या हाडांना डॅमेज नसला तरी तो अर्धा तास बेशुद्ध अवस्थेत होता त्यामुळे डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. डॉ गजानन सुरवाडे, डॉ अनिल पुंगळे, डॉ विकास राठोड आदी डॉक्टरांची टीम रवींद्र वर घाटीत उपचार करत आहे.

आमदारांनी घेतली भेट

दरम्यान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घाटीत रवींद्र याची भेट घेऊन डॉक्टरांना जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची विनंती केली. तर उद्यापासून समुपदेशन यात्रा काढून युवकांना समजावण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

Web Title: Maratha Kranti Morcha : youth trying Hanging himself