मराठा आरक्षणासाठी गुरुवारी ठिय्या ; रास्ता रोकोचे आंदोलन, बंदची हाक

बाळासाहेब लोणे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

गंगापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वय
समितीतर्फे गुरुवारी (ता. नऊ) गंगापूर तालुका बंदचे आवाहन करण्यात आले असून संयम, अहिंसक व शांततामय आंदोलन करण्याचे समितीच्या वतीने आवाहन बुधवारी (ता. आठ) करण्यात आले आहे.   

तालुक्यात दहा ठिकाणी रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील आणि सर्व विभागातील शाळा ,कॉलेज, दुकाने, व्यापारी वर्ग यांनी आपले दुकाने व इतर खाजगी संस्थाचालकाना विनंती करण्यात आली आहे. याविषयी प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले असून महाराष्टातील बहुसंख्येने असणारा मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे आपणही बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या संस्था बंद ठेवाव्यात.

तालुक्यात ठिठिकणी रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून यात वाळूज (पोलिस स्टेशन समोर), दहेगाव
बंगला,  जिकठाण फाटा, गंगापूर फाटा, ढोरेगाव, गंगापुर शहर (छत्रपती शिवाजी महाराज चौक), मालुंजा (शिवना नदीच्या पुलावर) सिध्दनाथ वाडगाव, लासूर स्टेशन (सावंगी चौक), पिंपळगाव (दिवशी) या ठिकाणांचा समावेश आहे.
तरी समाज बांधवांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता आपल्या जवळच्या ठिकाणावर हजार रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: For Maratha Reservation Agitation in Gangapur