#MarathaKrantiMorcha तुळजापुरात मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन

जगदीश कुलकर्णी
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

तहसील कार्यालयासमोर सुमारे अडीचशे महिलांनी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, जय भवानी - जय शिवराय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या घोषणा देत महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

तुळजापूर : मराठा आरक्षणासाठी येथील सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बुधवारी (ता. आठ) ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.

तहसील कार्यालयासमोर सुमारे अडीचशे महिलांनी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, जय भवानी - जय शिवराय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या घोषणा देत महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. सकाळी दहापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महिला मोठ्या संख्येने जमल्या. तेथून तहसील कार्यालयासमोर आल्या.

सकाळी अकरापासून तहसील कार्यालयासमोर त्यांनी आंदोलनास सुरवात केली. पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी मधुमती अमृतराव, वासंती मुळे, मीना सोमाजी, मुक्ता गवळी याच्यांसह अनेक महिला आंदोलनात सहभागी झाल्या आहेत

Web Title: Maratha Reservation Agitation is Started in Tuljapur