मराठा आरक्षणाच्या मागणीचे गेवराईत पडसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

बसवर दगडफेक, वीस जण ताब्यात
गेवराई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी गेवराई तालुक्‍यात तीन ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी गेवराईतील एका व मादळमोहीतील 19 तरुणांना ताब्यात घेण्यात आले. गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

शहरातून आज दुपारी जात असलेल्या औरंगाबाद-लातूर बसवर एका तरुणाने दगडफेक केली. यात बसच्या समोरील काचा फुटल्या. दुसऱ्या घटनेत तालुक्‍यातील मादळमोही पोलिस चौकीच्या बाजूलाच असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई-नारायणगड या बसवर गावांतील काही तरुणांनी आरक्षणाच्या घोषणा देत दगडफेक केली. सायंकाळी मादळमोही येथे गेवराई-नारायणगड बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फोडण्यात आल्या. दगडफेकीच्या घटनेत 19 तरुणांना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनांमुळे दिवसभर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Maratha reservation demand georai reaction