#MarathaKrantiMorcha आरक्षणासाठी औरंगाबादेत आणखी एकाची आत्महत्या

संदीप लांडगे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विजयनगरातील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी (ता. १०) पहाटे मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विजयनगरातील कारभारी शेळके (४३) यांनी शुक्रवारी (ता. १०) पहाटे मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.

कारभारी दादाराव शेळके (वय 43, गल्ली क्रमांक 4 विजयनगर, गारखेड परिसर, औरंगाबाद) यांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार पहाटे साडेतीनला उघडकीस आला. त्यांना 15 मिनिटांत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पुंडलीकनगर पोलिसांनी दिली. आत्महत्येच्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईडनोटमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, काल (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चाने बंद पुकारला होता. त्यानंतर आज ही घटना घडल्याने "कारभारी शेळके अमर रहे!" अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

Web Title: For Maratha Reservation one did suicide in Aurangabad