मराठा आरक्षणासाठी तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेतले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

लातूर : मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी लातूरमधील एका तरुणाने भरचाैकात अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन त्या तरुणाचे प्राण वाचविले.

लातूर : मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी लातूरमधील एका तरुणाने भरचाैकात अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन त्या तरुणाचे प्राण वाचविले.

हा प्रकार शनिवारी (ता. 4) सकाळी शिवाजी चौकात घडला. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू आहेत. निदर्शने दाखवली जात अाहेत. राजकीय नेत्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचेही पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. त्यातच लातूरमध्ये विजय तुकाराम मोरे (वय 25. रा. कैलास नगर) या तरूणाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

शिवाजी चौकात काही तरूण जमा झाले आहेत. ते घोषणो देत अाहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे ते तातडीने शिवाजी चौकात हजर झाले. त्यावेळी त्यांना मोरे हा तरुण रॉकेल ओतून घेत असल्याचे दिसले. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. त्याला शासकीस रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात अाले. या घटनेमुळे शिवाजी चौक परिसरातील पाेलिस बंदोबस्तात पोलिसांनी वाढ केली आहे. दरम्यान, मोरे हा छावा विद्यार्थी आघाडीचा पदाधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: maratha reservation a person try to suicide